एक मिठी
सुटली मिठी घट्ट तुझी , दूर माझ्या घेऊन गेली
जवळ येऊ कसा मी ,आईस अश्रू देऊन गेली
आलो जेव्हा जवळ मी , ओठ तुझे शिवून तू होती
करुन कान बंद माझे , पण एक मिठी सांगून गेली
मिठीत तू रडत होती , सुकलेले अश्रू पीत होती
पुसू न शकलो अश्रू हे , अन एक मिठी फ़सवून गेली
मिठीत मी आलो तुझ्या ,आणि वार मलाही बोचले
डोळ्यांत तुझ्या पाहुनी , मग एक मिठी रडवून गेली
शिवलेले ओठ माझे , अन घास भरवत होतीस तू
भूक मला खूप मोठी , बोटांस ह्या चाऊन गेली
दूर झालो जेव्हा मी , हे ओठ न्हवते शिवलेले
हे कान न्हवते बंद , सुटली मिठी ; हसवून गेली