Thursday, August 26, 2010

अंड

तेव्हा मी लहान होतो, डबक्यात एका बुडत होतो
काही कळायचच नाहि, उगीच रडत होतो

क्लास ला जातन रस्त्याच्या कडेने चलायचो
एका वाटेला बाईचे पोस्टर होते
तिच्यावर कपडे कमीच होते
मित्रांच्या नजरा चुकवून रोज ते पाहयचो
काहितरी व्हायच मला
चुकल्या सारख वाटायच मला

पण वाट कधी बदलली नाही आवड होती ती
रोज घरी तिचा विचार करायची सवड होती ती

एकदा आई बाबा भांडले पाऊस पडला
मला वटलं मीच चुकलो
पोस्टरची वाट घरी परतली

मग कधी वाट बदलली कधी लक्ष वेधले
तेव्हा स्वत:ला फ़सवावसं वटलं
पण भांडण थंबलं नाही
आणि मी फ़सलो ही नाही

डबक्यात बुडत असलेल्या एक लहान बाळाला पोस्टरची ओढ होती
आज वादळ आहे , डबकं बुडून गेलय, ओढ आजूनही पोस्टरचीच आहे
पण पोस्टर पडणार्या पावसात धुसर झालय

No comments: