Thursday, July 31, 2008

बार बाला


त्या मंद प्रकाशात बेधुंद होऊन नाचायचे
जे होईल ते सोसायचे

आम्हि आहोत बारबाला
लोक घालतात आम्हाला पैशांच्या माळा


हे पैसे वाटतात काट्यांसारखे
या काटेरी दुनियेत आपलेही होतात परके

हा धुंद प्रकाश असतो कळोखाहून भयानक
याच कळोखात दोळसपणे जगायचे
जे होईल ते सोसायचे

बार मधल्या गर्दीत असतो आम्हि एकटे
तव्यावर उभे राहुन खावे लागतात चटके

चटके खातच नियतीचे खेळ पाहायचे
अन जे होइल ते सोसायचे

नाचून काहि बरे वाटत नाहि
नाचल्या वाचून राहु शकत नाहि

सरकारनेहि आता सोन्याच्या बेड्या घातल्यात पायात
तेहि आवडून चालत नाहि

शेवटी पोटासाठी सगळे सहन करायचे
अन जे होइल ते सोसायचे

सलाम बोंबे तूच आमची माई
तूच आता पाहायचे
वाटल तर सगळे सोसूनच मरायचे