स्तब्ध झाली पावले ही ,वुझून गेल्या तारका...
हलवून गेले शुष्क वारे , ओला करुनी अंगरखा
दिस हे घोद्यावनी ,तबडक तबडक धावती...
नसांत उडती ज्वाला ,अन वस्त्र हा काळा बुरखा
दिशाभूल हे वारे ,लाटांच्या ओघात मी...
धुंद हे क्षितीज माझे ,शोधतोय बगरखा
काटे सांत्वनाचे बोचती ,स्पर्षास आहे आतुर मी...
काया माझी कोरडी ,कंठही पडलाय सुका
खिळल्या नजरा शंकेच्या ,अनावर हे वार आता...
खपली ही रक्तबंबाळ ,पण एड्सचा मी लाडका