आता कुणितरी हवेसे वाटावे
दार मनातले हळूच खटखटावे
इशारे हळूच मलाही उमजावे
मिही सुटलेले कोडे सोडवावे
गालिचे हिरवे गार स्वपनांतले
कुणितरी त्यावरती ताणून द्यावे
ह्य कुशीवरुन त्या कुशीवर वळता
हातानी तिच्या मला कुरवाळावे
हात टाळिची वाट पाहत आहे
टाळी मारून आवाज घुमवावे
चंचल जाहले चुटकी परी मन हे
आता मनाला लगाम सापडावे
उन्माद भलताच अंगावर आलाय
हलकेच आता थोबाडीत घ्यावे