Tuesday, June 10, 2008

पिंपळपान


पिंपळपान 03-05-2008

तुटले पिंपळपान पुन्हा
वारयावरती झुलणारे
सड्यात सामिल हो.ऊन
सुगंधास तुझ्या भुलणारे

कोवळे पान विसरून भान
तुझ्याच प्रहरी खुलणारे
स्पर्ष न करता तोडून तू
तुझ्यावर ते रुसणारे

वारयासंगती भटकून
तुझ्यापर्यंत पोहोचणारे
चिरडून तू पायांखाली
तिथे न आता रुजणारे

हिरवे पान सुकून गेले
सुकलेले अश्रु पुसणारे
नकळत सोसून सारे
पुन्हा न कधी ते फुलणारे

भेगा पडून गेल्या जरी
समोर तुझ्या न कुजणरे
सुकलेले पिंपळपान हे
आठवणींत त्या मुरणारे

4 comments:

Unknown said...

hey maybe u should try writin somethin in hindi and english too :|

Harshada Vinaya said...

khoop sunder aahe hi kavita..taral agadi........

Prajakta said...

phaar surekh!! Didn't knoe u were into poetry too...keep it up!!

Unknown said...

thank u !
the comments here shall continue to encourage me .:)