भिजत होतो पावसात मी , ओढ होति रेनकोटची .जवळ छप्पर वाट पाहत होते.थेंब पागोळ्या हो ऊन सांगत होते "भिजणार नहिस तू इथे". पण ओढ होति रेनकोटची.
शर्टानेही मिठी मारली होति मला..............
पण भिजत राहिलो पावसात मी ,निजत राहिलो स्वप्नांत माझ्या. वेळ सरत चालला होता, छप्पराकडे पाहत.
छप्परही भरत होते भिजलेल्या लोकांनी. पण स्वप्न मी रंगवत होतो त्या भिजलेल्या बोटांनी. रंगांची मात्र कमी होति. केनवस हि मळकट होता.काळा रंग त्यातून झळकत होता. तरिही रंगवत राहिलोकारण ओढ होति रेनकोटची.........
आजही भिजत आहे पावसात मी. उसने रंग , छप्परही खलि नाहि.
पण भिजण्यातहि मजा आहे
कारण ओढ आहे रेनकोटची...........
1 comment:
chhan ahe...avadali mala...
Post a Comment