Tuesday, June 10, 2008

पाऊस

पाऊस

वार्यात धारा धारांत पाणि,
का दूर तु माझ्या, जवळ बस ना माझी फ़ुलरणी.

हा पाऊस माझा तुझा ,
धुंद प्रेमात आपल्या ,
मग भिती कसली,
जवळ ही नाहित सावल्या.

डोल्यांत पाहुनी तुझ्या, म्रुग्धारा बरसल्या.
त्या मुसळधार पावसात भिजण्यासठी, माझ्या पापण्याही तरसल्या.

तुझ्या ओल्याचिंब शरीराला पाहुन, मनी जो सुगंध दरवळला .
पाऊस ही त्यामुळे, त्या मातीच्या गंधास विस्मरला.

तुझ्या गारठलेल्या ओठंची लाली पाऊस घेऊन जात होता,
लाल पाण्यात घेऊन आपल्या प्रेमाचे रंग दाखवीत होता

मग का थांबवु मी त्यासि,
जो परतत होता माझ्याकडे देऊन स्पर्श तुझसी.

हातात हात घेऊन ,चल ओलेचिंब हो.ऊ या पावसात .
नाचू त्या पावसाच्या लयात, फ़क्त तुझ्या सहवासात.

मग बिलग तू मला ,ठेऊन तुझे मस्तक माझ्या छातीवर,
ऊचलून तुझ्या टाचा त्या ओल्या ओल्या मातीवर.

मातीच्या त्या चिखलात पाय तुझे भिजतील ,
बनवून टेकु मला शरीर तुझे नीजतील.

मग ऊचलून तुला घेऊन जाईन मी छप्पराखाली ,
घेऊन हात माझा, त्या ओल्या ओल्या केसांखाली.

तू बघीत रहा मला त्या प्रेमळश्या नजरेने,
दुसर्या पावसाची वाट पाहत या मेघांच्या गजराने .

2 comments:

Snehal Tambe said...

that's just so beautiful....

Harshal said...

पाऊस ही त्यामुळे, त्या मातीच्या गंधास विस्मरला.

kai kalpana ahe... apratim !!!!