Tuesday, June 10, 2008

खिन्न मनास

खिन्न मनास
मन आज खूप खिन्न आहे,
दाबून भावना मनात मन खूप सुन्न आहे.

हसून किती रे दखवू तुम्हास मन माझे तेवढेच उदास आहे,
हस्ण्यावर जाऊ नका माझ्या हातर ऊगीच तुमचा भास आहे.

एकटाच मी तुम्हांत जसा तारा तारकांत,
चंद्राच्या वाटेवर जऊन त्या मंद चांदण्यात.

समजावून स्वतःच स्वतःला क्षण साठवतो आहे मी,
त्रासलेल्या मनास सावरण्याकरता कुणी आहे का हे आठवतो आहे मी.

ह्रिदयास बांध किती स्पंदनात गुंतलेले,
गुliयास सोडविताना गाठीच बसतील रे.

मन मोकळे करण्यास टेकूच नाहि आता,
दूर आहे तुम्हापासून जवळ कुणीच नाहि आता.

वाट पाहत पाहत मन भटकतय शून्यात,
नजरा हि स्थीर डोल्यांतले अश्रू थांबवून.

कुणास सांगू माझ्या मनाची व्यथा ,
बनून रहील ती तुमच्याकरता फ़क्त एक कथा.

खूप दूर गेल्यासारखे वाटते तुम्हापासून मला,
पाठीसोडून गेलात तुमच्या या निरागस बाळाला.

मन आज खूप खिन्न आहे ,
पण .......त्याल मीच जिवाशी कवटाळले आहे .

1 comment:

Sameeta Kambli said...

Saglya poems chan ahet!!! khup khup avadlya!!!!..
Beautiful..You've a big fan here!..kadhi publish vagairey kelyas tar sang, book nakki ghein ;)
Waiting for more!