Tuesday, June 10, 2008

आठवण

आठवण
ते क्षण आता आठवण म्हणुन आठवून येतात,
या थंड वातावरणात आठवणिही गोठून जातात.

आनंदचा खरा आभास दु:खातच जाणवतो,
त्या क्षणांचा आनंद आता या गोठलेल्या आठवणिंतच कळतो.

त्याच आठवणी आता ह्रिदयात दाटून येतात,
मी आलो नाहि तरी त्या मला तुझ्या पर्यंत नेतात.

तुझ्या आनंदात मी नसलो तरी माझ्या आठवणी जरूर असतील,
तुझ्या आनंदाचे गाणे माझ्या आथवणीच गात असतील.

पण हे तुझ्या आनंदचे क्षण आता नाहि आठवणार,
कारण तुझ्या आठवणिंपैकी एक आठवण कमी होणार.

ह्या आनंदात न सामिल व्हायची कधीच राहणार नाहि खंत,
कारण तुझ्या प्रेमळ आठवणिंचा कधीच होणार नाहि अंत

आजवरहि त्याच आथवणी मला खुश करताहेत,
पुन:पुन्हा नव्याने जगण्याचा जोश भरताहेत.

म्हणून या तुझ्या आनंदात मी ही आज आनंदी आहे,
तुझ्या प्रेमाच्या पिटार्यात आजही मी बंद आहे.



3 comments:

Unknown said...

I bliv this 1 is particularly nice

Unknown said...
This comment has been removed by the author.
Snehal Tambe said...

that's one hell of a masterpiece!!
great going vaibhav!!!